Home Breaking News कोलकाता मेडीकल कॉलेज बलात्कार व हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २० ऑगस्टला सुनावणी

कोलकाता मेडीकल कॉलेज बलात्कार व हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २० ऑगस्टला सुनावणी

101
0

पुणे दिनांक १८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार कोलकाता येथील आरजी कर मेडीकल कॉलेज मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलावर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची आता सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे.भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला व मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर दिनांक २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.आरजी कर मेडीकल कॉलेज मध्ये एमसीएच मध्ये ड्युटीवर असताना एका महिला प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.दरम्यान सुरुवातीला हे प्रकरण या मेडीकल कॉलेजच्या वतीने दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.दरम्यान यात सामजिक संघटना व मिडियाच्या वतीने तसेच विरोधी पक्षांनी आणि डॉक्टरांच्या संघटनांनी यावर आवाज उठवल्यानंतर या प्रकरणाची आता सीबीआय मार्फत चौकशी सुरू आहे.आता यात सर्वोच्च न्यायालयाने देखील स्वतःहून दखल घेतली आहे.

Previous articleखासगी लक्झरी बस व मॅक्सपिक‌अपची समोर समोर भिषण धडक, रक्षाबंधनला निघालेल्या १० मजुरांचा मृत्यू ३७ जण गंभीर रित्या जखमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Next articleकसारा घाटात दुधाचा टॅंकर ३०० फूट खोल दरीत कोसळून ५ जणांचा घटनास्थळीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here