पुणे दिनांक १८ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून जयपूर येथील मोनिलेक आणि सीके बिरलासह राजस्थानातील एकूण १०० पेक्षा जास्त हाॅस्पीटलला बाॅम्बच्या सहाय्याने उडविण्याची धमकी आली आहे.’ हाॅस्पीटलच्या बेडखाली तसेच स्वच्छता गृहात बाॅम्ब आहे.तसेच हाॅस्पीटलमधील प्रत्येकजण यामध्ये मारला जाईल.सर्वत्र रक्तपात होईल.तुम्ही सर्व जण मृत्यूला पात्र आहात.असे धमकीच्या मेल मध्ये म्हटले आहे.दरम्यान मेल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख ‘ लाखा टेररिस्ट चिंग अॅड कल्टिस्ट ‘ अशी सांगितली आहे.