पुणे दिनांक १९ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे महायुतीमधील उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील होमपीच असलेल्या शहरातील कळमना पोलिस चौकीतच चक्क ड्रेसवर असलेल्या पोलिस अधिकारी यांनी जुगारीचा क्लब सुरू करून चक्क जुगार खेळताना अधिकारी व कर्मचारी यांचा एक व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्या व्हिडिओने पोलिस खात्याची चांगलीच पोलखोल केली आहे.
दरम्यान या ठिकाणी चौकीत गेलेल्या एका तक्रारदार यांने हा व्हिडिओ काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.दरम्यान पोलिस कायदा सुव्यवस्था अबाधित राखून नागरिकांना सुरक्षा देण्याकरीता असतात पण नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.आणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आताच्या महायुतीत असणारे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे होमपीच मध्येच जर चक्क सरकारी ड्रेसवर व पोलिस चौकीतच या महाशयांनी चक्क जुगारीचा अड्डा सुरू करुन आपल्या बरोबर अन्य पोलिस कर्मचारी यांच्या बरोबर जुगार खेळत असल्याचा व रिव्हालवर टेबलवर ठेऊन तसेच सिगारेटचे झुरके मारत असतानांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओने महाराष्ट्रातील तमाम पोलिस खात्याची आब्रूच चव्हाट्यावर मांडली आहे.यात महाराष्ट्रात काही प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी देखील या राज्यात असून ते त्यांचे कार्य निष्ठेने पार पाडत असतात पण काही अधिकारी हे आपल्या अशा वागण्याने पोलिस खात्याची व गृहमंत्रालयाची आब्रूचं खोबरं करतात अशा ‘ नालायक अधिकारी व कर्मचारी ‘ यांच्यावर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार? हे लवकरच स्पष्ट होईल.यात काही शंका घेण्याचे कारण नाही? जर पोलिस रक्षकच असे वागत असतील तर इतर सामान्य माणसांनी यांच्या कडून कुठल्या प्रकारचा बोध घ्यायचा हे न उलगडणारे एक मोठे कोडे आता या व्हिडिओ नंतर समोर आले आहे.