पुणे दिनांक १९ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात राजकारणात मोठी उलथा पालथ होण्याची शक्यता आता राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.याताच महायुतीत जागा वाटप हा एक कळीचा मुद्दा ठरणार असून आता या वरुन धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.याताच पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात काढलेली जनसंवाद यात्रा आली असता भारतीय जनता पार्टीच्या आशा बुचके व त्यांच्या सहकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून यावेळी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला होता.यावेळी आशाताई बुचके यांनी पालकमंत्री अजित पवार हे जिल्ह्यात दुजाभाव करतात ते योग्य पालकत्व करत नाहीत. असा आरोपच यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केला होता.यावर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील राजकारणात मोठे काही तरी होणार आहे.लोकांनी सावध रहावं असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.