Home Breaking News सबसे कातिल गौतमी पाटीलला अहमदनगर कोर्टाकडून जामीन मंजूर

सबसे कातिल गौतमी पाटीलला अहमदनगर कोर्टाकडून जामीन मंजूर

76
0

पुणे दिनांक १९ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगर येथील झालेल्या कार्यक्रमाला परवानगी न घेता कार्यक्रम केला म्हणून गौतमी पाटील हिच्यावर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी  पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल केला होता.दरम्यान आज अहमदनगर जिल्हा न्यायालयाने तिला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान सर्व साधारण एक वर्षांपूर्वी अहमदनगर येथील पाईपलाईन येथे गणपती विसर्जनाच्या दिवशी तिचा नृत्यांगनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती.मात्र गौतमी पाटील हिने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदरचा कार्यक्रम केल्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी 👮 तिच्यावर विनापरवानगी कार्यक्रम केला व नियामाचे उल्लंघन केले म्हणून तिच्यावर अहमदनगर येथील तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा सर्व प्रकार एक वर्षांपूर्वीचा असून ती आज अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात हजर झाली होती.यावेळी न्यायालयाने अटी आणि शर्ती नुसार नृत्यांगना गौतमी पाटील हिला जामीन मंजूर केला आहे.

Previous articleजळगाव शिक्षक पतपेढीच्या सभेत शिक्षकांन मध्येच दे दणादण, यांच्याकडून विद्यार्थी काय आदर्श घेणार?
Next articleपुण्यात आज देखील मुसळधार पाऊस कोसळणार यलो अलर्ट, पश्चिम महाराष्ट्राला देखील यलो अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here