पुणे दिनांक १९ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गावातून एटीएसच्या टीमने एकूण ४ जणांना अटक केली आहे.दरम्यान भारतात बेकायदेशीर रित्या घुसखोरी करून राहणा-या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान नाशिक पोलिस व एटीएमच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरची कारवाई करण्यात आली आहे तसेच या बांगलादेशींना भारतात राहण्यासाठी मदत करणां-या एका महाराष्ट्रीयन युवकाला देखील एटीएसच्या टीमने ताब्यात घेतले आहे.दरम्यान पोलिसांनी व एटीएसच्या टीमने त्यांच्या कडून मोबाईल व काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.