पुणे दिनांक १९ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नुकत्याच चार विधानसभांच्या निवडणूका जवळ आल्या असताना त्या निवडणूका एकत्र न घेता निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्र राज्य आणि झारखंड राज्यातील निवडणूका दिवाळीनंतर घेतल्या जातील असे नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.आता यावरुन उध्दव ठाकरे गटाचे ‘ दैनिक सामना ‘ मधून केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली आहे.दरम्यान महाराष्ट्र राज्य व झारखंड राज्यात भारतीय जनता पार्टी पराभूत होणार आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाने हे दोन राज्य वगळून फक्त जम्मू – कश्मीर आणि हरीयाना या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर करुन आजचे मरण उद्यावर ढकलले आहे.असे दैनिक सामना या वृत्तपत्रात म्हटले आहे.