Home Breaking News नागपुरात पोलिस चौकीत जुगार खेळणारे दोघे पोलिस कर्मचारी निलंबित

नागपुरात पोलिस चौकीत जुगार खेळणारे दोघे पोलिस कर्मचारी निलंबित

65
0

पुणे दिनांक २० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नागपूर येथील कळमना पोलिस चौकीत जुगार खेळत तसेच सिगारेटचे झुरके मारत धुम्रपान करणाऱ्या दोन पोलिसांवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी दोघांना आता निलंबनाची कारवाई केली आहे.दरम्यान सोमवारी पोलखोलनामाने याची न्यूज लावून चांगलीच पोलखोल केली होती.व यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.दरम्यान सदरचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.सदरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र  या प्रकरणी पोलिस खात्याची व गृहखात्याची अब्रूचे धिंडवडे काढले होते.व प्रकार गंभीर होता.पोलिसच असे वागत असतील आणि कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणार असतील तर अशा पोलिस कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे होते.दरम्यान या बाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या नंतर अखेर गृहखात्याला उशीर का होईना जाग आली व नागपूरचे पोलिस आयुक्तांनी पोलिस कर्मचारी मनोज घाडगे.व भूषण साहू -साखरे या दोघांना तडका फडकी आज निलंबित केले आहे.

Previous articleपुण्यात आज देखील मुसळधार पाऊस कोसळणार यलो अलर्ट, पश्चिम महाराष्ट्राला देखील यलो अलर्ट
Next articleबदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचारानंतर आंदोलक उतरले रेल्वे ट्रॅकवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here