Home Breaking News बदलापूरात रेल्वे स्टेशनवरील आंदोलनकर्ते आक्रमक आंदोलनकर्त्यांना हाटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक आंदोलन...

बदलापूरात रेल्वे स्टेशनवरील आंदोलनकर्ते आक्रमक आंदोलनकर्त्यांना हाटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक आंदोलन चिघळले

66
0

पुणे दिनांक २० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी 👮 फिर्याद दाखल करून न घेता त्या पालकांना तब्बल १२ तास बसवून ठेवले व आरोपीला एक प्रकारे मदत केली.यासाठी शाळेच्या वतीने व  राज्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनावर दबाव टाकून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे आज संपूर्ण बदालापूर रोडवर उतरले आहेत.व संतप्त झालेल्या महिलांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी यावे अशी मागणी केली आहे.व पोलिसांनी 👮 यात सहकार्य केले नाही.अशी संतप्त झालेल्या महिलांची मागणी आहे.तसेच मेडीकल रिपोर्ट दाबण्याचा प्रयत्न यात पोलिसांनी केला आहे. तसेच यात बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलनकर्ते यांना रेल्वे ट्रॅकवरुन हाटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर संतप्त झालेल्या नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवरील दगड फेकून मारुन पोलिसांना फेटाळून पळवले आहे. आता आंदोलनकर्ते खूपच आक्रमक भूमिकेत आहेत. मात्र गृहमंत्री व शिक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्री हे घटना स्थळी का जात नाही.ही शाळा एक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी जवळीक असलेल्या व्यक्तीची आहे.त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली नाही.असा आरोप आता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

दरम्यान या सर्व प्रकारणात मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप झाल्यांचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.पण ह्या प्रकरणांवर जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे.असा समज बदलापूरकर नागरिकांचा झाला आहे.व यातूनच हे आंदोलन आता खूप मोठ्या प्रमाणावर चिघळले आहे.तसेच यातील महिला आंदोलक यांनी यातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला शिक्षा देतो अशी मागणीच केली आहे. तर आंदोलनकर्ते आता आपल्या मागण्यावर ठाम आहे.शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आता बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे.अशी भूमिका आता महिला आंदोलनकर्ते करीत आहेत.आता हे आंदोलन खूपच उग्र होताना दिसत आहे.एकंदरीत या आंदोलनाला सामोरे जाण्यासाठी महायुतीचे मंत्री घाबरत आहे. जर या सरकारने सकाळीच आंदोलनकर्ते यांच्या बरोबर चर्चा करुन मार्ग काढायला पाहिजे होता ?  असे प्रयत्न झाला असता तर हे आंदोलन चिघळले नसते असे आता सर्वसामान्य नागरिक म्हणत होते.पण या सरकार मधील मंत्री फक्त 🐫 उंटावर बसून फक्त मिडिया समोर कारवाई बाबत घोषणा देत होते. आता संतप्त झालेल्या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी यावे अशी मागणी केली आहे.

Previous articleबदलापूरातील शाळेचे गेट तोडून संतप्त जमाव आत घुसून शाळेची केली तोडफोड महिलांची संख्या लक्षणीय
Next articleबदलापुर येथे आंदोलकाची समजूत काढण्यासाठी आलेल्या गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरुन घेतला काढता पाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here