Home Breaking News महामार्ग पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे हे करणार बदलापूर रेल्वे ट्रॅकची पाहणी

महामार्ग पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे हे करणार बदलापूर रेल्वे ट्रॅकची पाहणी

73
0

पुणे दिनांक २० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथील रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करुन त्यांना हुसकावून रेल्वे ट्रॅकच्या बाहेर काढले आहेत.आता जवळपास दहा तास हे आंदोलन सुरू असल्याने रेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. दरम्यान आता संध्याकाळी चाकरमानी हे आपल्या घरी येण्यासाठी निघले आहेत.लोकलसेवा बंद असल्याने सदरची सेवा पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनी 👮 आंदोलन कर्ते यांच्यावर लाठीचार्ज केला आहे.दरम्यान लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे हे आता या रेल्वे ट्रॅकची पाहणी करत आहेत.

दरम्यान रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आंदोलनकर्ते यांच्यावर लाठीचार्ज करुन त्यांना रेल्वे स्टेशनच्या बाहेर काढले आहे.त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मुरबाड एसटी बसवर दगडफेक केली तसेच पोलिसांच्या खासगी कारवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली तसेच त्या खासगी कार पलटी केल्या दरम्यान मुरबाडची एसटी बस जात असताना आंदोलनकर्त्यांनी बसवर मोठे दगडी ब्लाॅक मारुन एसटी बस फोडली यावेळी बस मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी होते.त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.दरम्यान आता रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. रेल्वे प्रवासी कमी पण पोलिसांची संख्या जास्त संपूर्ण छावणीचे स्वरूप रेल्वे स्टेशनला आले आहे.आता थोड्याच वेळात रेल्वे ट्रॅकवर लोकलसेवा सुरू होईल.

Previous articleमहायुतीचे गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशावरून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज.लाडक्या बहिणींवर लाठीचार्ज
Next articleमंगलदास बांदल यांची रात्री ईडीने केली उचलबांगडी आज मुंबईतील कोर्टात करणार हजर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here