Home Breaking News महायुतीचे गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशावरून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज.लाडक्या बहिणींवर लाठीचार्ज

महायुतीचे गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशावरून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज.लाडक्या बहिणींवर लाठीचार्ज

62
0

पुणे दिनांक २० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मागणी दहा तासांपासून बदलापुरात सुरू असलेल्या महिलां व पुरुष आंदोलनकर्त्यांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून आता आंदोलन कर्तेंवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.यात रेल्वे ट्रॅकवर चप्पलांचे ढिगच ढिग पडले आहेत.दरम्यान  आंदोलनकर्त्यांनी यावेळी पोलीसांवर दगडफेक सुरू केली आहे.तसेच पोलिस कर्मचारी हे मिडियाला देखील येथून हुसाकावून लावत आहे.फडणवीस यांचे लाडके मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलनकर्त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने फडणवीस यांनी जादाची पोलिस फोर्स आणून लाडक्या बहिणीवर व आंदोलन कर्ते यांच्यावर लाठीचार्ज केला आहे.

दरम्यान आज जे आंदोलन झाले ते महायुतीच्या गृहखात्याच्या वतीने पालकांची बदलापुर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद न घेतल्याने झाले होते.जर पोलिसांनी 👮 तात्काळ फिर्याद घेतली असती तर आज ही आंदोलनाची परिस्थिती चिघाळली नसती  व सरकारच्या लाडक्या बहिणींवर लाठीचार्ज करावा लागला नसता? आता बदलापुर रेल्वे स्टेशनवर आज संपूर्ण पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहेत.या पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक महिला गंभीर रित्या जखमी झाले आहे.तर काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.व रेल्वे स्टेशन बाहेर देखील पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच सदरची आदर्श प्राथमिक शाळा ही भाजपच्या पदाधिकाऱ्याची आहे.त्यामुळे पोलिसांनी पालकांची फिर्याद घेतली नाही असा आरोप आता राजकीय पक्षांकडून करण्यात आले.तसेच दगडफेक करणारे आंदोलनकर्ते यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Previous articleबदलापुर येथे आंदोलकाची समजूत काढण्यासाठी आलेल्या गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरुन घेतला काढता पाय
Next articleमहामार्ग पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे हे करणार बदलापूर रेल्वे ट्रॅकची पाहणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here