Home Breaking News राहुल यांनी राजीव गांधींना वाहिली श्रध्दांजली, मुंबईत आज काॅग्रेसचा संकल्प मेळावा

राहुल यांनी राजीव गांधींना वाहिली श्रध्दांजली, मुंबईत आज काॅग्रेसचा संकल्प मेळावा

63
0

पुणे दिनांक २० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती आहे.त्यामुळे त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्लीतील राजीव गांधींच्या समाधीस्थळावर वीरभूमी येथे जाऊन पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली आहे.एक दयाळू व्यक्तीमत्व.बाबा तुमच्या शिकवणी माझी प्रेरणा आहेत आणि भारतासाठीचे तुमची स्वप्ने माझी स्वतःची आहेत.तुमच्या आठवणी सोबत घेऊन मी ते पूर्ण करीन.असे राहुल गांधी यांनी एक्सवर ट्विट पोस्ट करत म्हटले आहे.

दरम्यान आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत सद्भावना दिवस आणि संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी तीन वाजता पुष्णमुखानंद सभागृहात हा मेळावा होणार आहे.सदरच्या मेळाव्यासाठी काॅग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे.तसेच महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला.यांच्यासह महाराष्ट्र मधील काॅग्रेस पक्षाचे नेते.उपस्थीत रहाणार आहेत. या शिवाय उध्दव ठाकरे आणि जेष्ठ नेते शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleबदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचारानंतर आंदोलक उतरले रेल्वे ट्रॅकवर
Next articleबदलापूरातील शाळेचे गेट तोडून संतप्त जमाव आत घुसून शाळेची केली तोडफोड महिलांची संख्या लक्षणीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here