पुणे दिनांक २० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात मागील तीन दिवसांपासून रोज मुसळधार पाऊस कोसळत आहे.अजून दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पुण्यात कोसळणार आहे. तसा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.तरी नागरिकांनी सतर्क राहावे.असे आवाहन देखील करण्यात आले आहे.दरम्यान राज्यात सर्वत्र पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे.पुणे सह पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. यात आता ☁️ ढगांची निर्मिती झाली असून परिणामी जोरदार व मुसाळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मागील २४ तासांत उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
दरम्यान आज मंगळवारी हवामान खात्याच्या वतीने पुणे.रत्नागिरी.सिंधुदुर्ग.जळगाव.सातारा.सांगली.या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तसेच मुंबई.ठाणे.पालघर.रायगड.नंदूरबार.धुळे. नाशिक.अहमदनगर.सोलापूर.या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर.जालना.बीड. परभणी.धाराशिव.जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसाळधार पावसाची शक्यता आहे.तर विदर्भातील बुलडाणा.अकोला.अमरावती.वाशिम.यवतमाळ.वर्धा नागपूर.भंडारा.गोंदीया.चंद्रपूर.गडचिरोली.या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.