Home Breaking News बदलापुर येथे आंदोलकाची समजूत काढण्यासाठी आलेल्या गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरुन घेतला काढता...

बदलापुर येथे आंदोलकाची समजूत काढण्यासाठी आलेल्या गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरुन घेतला काढता पाय

66
0

पुणे दिनांक २० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापुर येथील खासगी शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांची घटना घडल्यानंतर आज संपूर्ण बदालापुरकर रस्त्यावर उतरलेल्या आहेत. त्यांनी आज सकाळपासूनच बदलापुर येथील रेल्वे ट्रॅकवर मोठ्या संख्येने महिला व पुरुष आंदोलनकर्ते उतरले असून संपूर्ण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.यात आप आणि डाऊन दोन्ही रेल्वेमार्ग बंद पडले आहे.महायुती सरकार मधील मंत्री गिरीश महाजन हे आंदोलनस्थळी आंदोलकांना सदरचे आंदोलन मागे घ्या यासाठी तब्बल एक तास आंदोलकांशी चर्चा केली पण ती चर्चा व्यर्थ ठरली आहे.यावेळी आंदोलकांनी संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी लावून धरली .व आंदोलनकर्ते मागील आठ तासांपेक्षा हे आंदोलन करत असून ते आंदोलनावर ठाम आहे. शेवटी आंदोलनस्थळावरुन मंत्री गिरीश महाजन यांनी आता काढता पाय घेतला आहे.

दरम्यान आज आंदोलनस्थळी लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे पोलिस आयुक्त संजय जाधव  तसेच जिल्हाधिकारी यांनी आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा केली पण यात काहीच मार्ग निघाला नाही.सर्व आंदोलनकर्ते आरोपी अक्षय शिंदे याला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी लावून धरली आहे.दरम्यान राज्य सरकारच्या वतीने पालकांची फिर्याद घेण्यात टाळाटाळ केली म्हणून संबंधित बदलापुर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक हवालदार यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक तसेच दोन महिला शिपाई.यांचे देखील निलंबन केले आहे.तसेच या शाळेचे प्रशासन व अध्यक्ष यांच्यावर देखील कारवाई सुरू केली असून संबंधित शाळांची मान्यता देखील रद्द करण्यात येणार आहे.तरी बदलापुर येथील आंदोलनकर्ते हे आंदोलना वर ठाम आहेत

Previous articleबदलापूरात रेल्वे स्टेशनवरील आंदोलनकर्ते आक्रमक आंदोलनकर्त्यांना हाटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक आंदोलन चिघळले
Next articleमहायुतीचे गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशावरून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज.लाडक्या बहिणींवर लाठीचार्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here