Home Breaking News बदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचारानंतर आंदोलक उतरले रेल्वे ट्रॅकवर

बदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचारानंतर आंदोलक उतरले रेल्वे ट्रॅकवर

70
0

पुणे दिनांक २० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचारानंतर बदलापूर येथील नागरिक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आज सकाळी सहा वाजल्यापासून बदलापूर येथील रेल्वे ट्रॅकवर आता उतरले आहेत.यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी महायुतीचे सरकार व प्रशासनाच्या विरोधात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू केली आहे.दरम्यान बदलापूर रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ च्या रेल्वे ट्रॅकवर हे आंदोलन कर्ते मोठ्या संख्येने उतरले आहेत.व रेल्वे रोकोचे आंदोलन केले आहे.त्यामुळे आता मध्यरेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

दरम्यान या प्रकरणी बदलापूर येथील खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर एका अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला होता.सदर घटना घडल्या नंतर बदलापूर पोलिसांनी १२ तासांपेक्षा जास्त जास्त वेळ होऊनही आरोपींवर कारवाई न केल्याने आता पालक व बदलापूर येथील नागरिक चांगलेच संतप्त झाले असून आता नागरिक प्रचंड संतप्त झाले असून काही नागरिक व पालक शाळेवर देखील आंदोलन सुरू केले आहे.पण शाळेचे प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचे आहेत.त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने आता नागरिक व पालक चांगलेच आक्रमक होत त्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन वर ट्राॅकवर उतरुन प्रशासन व महायुतीच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत.शेकडो नागरिक रेल्वे रुळावर उतरल्याने आता मध्यरेल्वेची वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.

Previous articleनागपुरात पोलिस चौकीत जुगार खेळणारे दोघे पोलिस कर्मचारी निलंबित
Next articleराहुल यांनी राजीव गांधींना वाहिली श्रध्दांजली, मुंबईत आज काॅग्रेसचा संकल्प मेळावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here