पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोलकात्याप्रमाणे बदलापूरच्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाने का घेतली नाही, बदलापूर येथील आदर्श प्राथमिक शिक्षण संस्थेत दोन चिमुकल्यावर अत्याचार शाळेतील रोजंदारीवर असलेल्या स्वच्छता कामगार अक्षय शिंदेने केला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी संबंधित आहे. आता असा सवाल शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महायुती सरकार मधील मंत्री गिरीश महाजन यांचे डोके फिरले असून त्यांनी या प्रकरणात तरी आता राजकारण करु नये.हे सरकार राज्यघटनेवर अत्याचार करुन स्थापन झाले, अशा शब्दांत राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या सरकारवर टीका केली आहे.