पिंपरी -चिंचवड २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पिंपरी चिंचवड येथील बौद्ध नगर येथील एका घरात आज सकाळी ही घटना घडली असून घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असून यात घरातील एकूण पाच जण गंभीर रित्या होरपळले आहे.त्यांना प्रथम तातडीने उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आता त्यांच्या वर बर्न वार्डात उपचार सुरू आहेत.
दरम्यान यात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला यात घरातील पाच जण जखमी झाले आहेत.त्यांची नावे १) मनोज कुमार ( वय १९ रा.पिंपरी चिंचवड) २) धीरज कुमार ( वय २३ रा.पिंपरी चिंचवड) ३) गोविंद राम ( वय २८ रा.पिंपरी चिंचवड) ४) राम चेलाराम ( वय ४० रा.पिंपरी चिंचवड) ५) सत्येंदर राम ( वय ३० रा.पिंपरी चिंचवड) या प्रमाणे आहेत. दरम्यान घरगुती सिलिंडरचा पाईप लिक झाल्यानंतर हा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.