पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील पैलवान व जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि जिल्ह्यातील दबंग पैलवान नेते अशी ओळख असलेल्या मंगलदास बांदल यांच्या घरी ईडीने मंगळवारी सकाळीच त्यांच्या दोन्ही निवासस्थानी छापे मारी केली यात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व पुणे शहरातील महमंदवाडीतील घरात ही एकत्रित रित्या छापेमारी झाली . त्यांच्या दोन्ही निवासस्थानी ५ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांन द्वारे मिळत आहे.त्यांना रात्री उशिरा साडेअकरा वाजता ईडीने अटक करुन मुंबईला नेण्यात आले आहे.छापेमारी वेळी बांदल हे पुण्यातील महमंदवाडी येथील निवासस्थानी होते.आज त्यांना मुंबईतील कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान बांदल यांच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील निवासस्थानी कागद पत्रांची आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बॅंक लाॅकरची तपासणी ईडीच्या अधिकां-यानी केली.ईडीच्या प्राथमिक माहिती सूत्रांकडून सांगण्यात आले की या छाप्यात एकूण ५ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचेही सांगितले जात आहे.तसेच त्यांच्या ताब्यात एकूण पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी रुपयांचे मनगटी घड्याळ आढळून आले आहेत. दरम्यान ईडीच्या अधिकारी यांनी तब्बल १६ तास पेक्षा अधिक वेळ कारवाई करुन त्यांना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. त्यांना मुंबई येथे ईडीचे पथक घेऊन गेले आहे.बांदल आतापर्यंत चारवेळा ईडीच्या समोर हजर झाले होते. दरम्यान गोपीनीय पध्दतीने ईडीच्या वतीने छापा टाकण्यात आला आहे.तसेच निवासस्थानाच्या दोन किलो मीटर परिसर त्यांनी सील केला होता.तसेच घरातील कोणत्याही व्यक्तीला घराच्या बाहेर किंवा आत जाण्यास परवानगी नव्हती.सदरच्या छाप्यात मोठी रक्कम व अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.बांदल हे शिरूर विधान सभा करीता निवडणूकीची तयारी करत होते.याच पार्श्वभूमीवर ईडीच्या वतीने त्यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात आली आहे.अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.दरम्यान मनी लाॅंड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना एक वर्षांपूर्वीच नोटीस बजावली होती.तसेच त्यांच्या वर प्राप्तीकर विभागाच्या वतीने बांदल यांच्या निवासस्थानी छापा मारण्यात आला होता.त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर रक्कम व अलिशान वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.मंगलदास बांदल हे सध्या पुण्यातील शिवाजीनगर येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूक प्रकरणी सध्या जामीनावर बाहेर आहेत.