पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील शिवाजीराव सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी पैलवान मंगलदास बांदल यांना २९ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.यु.कदम यांनी या बाबतचे निर्देश दिले आहेत.आज मध्यरात्री बांदल यांना पुण्यावरून अटक केली होती.
दरम्यान मंगलदास बांदल यांच्या पुण्यातील दोन्ही घरावर ईडीच्या धाडी सुरू होत्या.या धाडीत कोट्यवधी रुपयांची रक्कम व तसेच अलिशान गाड्या व मनगटी घड्याळ सापडले होते.दरम्यान ईडीने त्यांना आज मुंबई येथील सत्र न्यायालयात विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते.यावेळी बांदल यांच्या वतीने जेष्ठ वकिल आबाद पोंडा तर ईडीच्या वतीने सुनील गोन्साव्लिस यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.दोन्ही वकिलांच्या युक्तिवादा नंतर न्यायाधीश यांनी मंगलदास बांदल यांना दिनांक २९ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.