Home Breaking News बदलापूरातील घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची घोषणा

बदलापूरातील घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची घोषणा

57
0

पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ दिनांक २४ ऑगस्ट रोजी शनिवारी महाराष्ट्र बंदची घोषणा आज महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.आज बुधवारी दुपारी या संदर्भात विकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रित रित्या मिंटीग झाली यात महाराष्ट्र बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे.अशी माहिती माध्यमांना काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकल्यांवर शाळेत रोजंदारीवर असलेल्या सफाई कामगारांने लैंगिक अत्याचार केला होता.त्याबाबत संबंधित चिमुकल्यांचे पालक हे बदलापूर पूर्व पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिण्याकरीता गेले असता त्यांना पोलिसांनी १२ तास पोलिस स्टेशन मध्ये ताटकळत उभे करुन तुमच्याकडे याबाबत काय पुरावे आहेत असे म्हणून पालकांची फिर्याद घेण्यात नकार देण्यात आला होता.संबंधित शाळा ही भारतीय जनता पक्षाचे व आर‌एएसचे पदाधिकारी असलेल्या लोकांची असल्याने आपल्या संस्थेची बदनामी होईल या हेतूने पोलिसांवर राजकीय दबाव होता.असा आरोप यावेळी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी बदलापूर येथील नागरिक हे या प्रकरणानंतर चांगलेच संतप्त झाले व त्यांनी या शाळेचे गेट तोडून शाळेत घुसून तोडफोड केली.तसेच बदलापूर रेल्वे स्टेशनवर व रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केले होते.याच दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना लाठीचार्ज केला व त्यांना रेल्वे स्टेशन व रेल्वे ट्रॅकवरुन हुसकावून लावले.दरम्यान या आंदोलनकर्ते यांच्यावर लाठीचार्ज सरकारच्या वतीने करायला नको होता.असे यावेळी  काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.दरम्यान हा घडलेला सर्व प्रकार निंदनीय आहे. महाराष्ट्रात अनेक लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक २४ ऑगस्ट रोजी शनिवारी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे.यात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे आमदार व खासदार तसेच नेते मंडळी मोठ्या संख्येने या बंदात सहभागी होणार आहे.अशी माहिती दिली आहे.

Previous articleबदलापूर चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे वकिल पत्र घेण्यास वकिलांचा नकार
Next articleबदलापूर येथे वार्तांकन करणा-या महिला पत्रकाराला अपशब्द वापरणा-या वामन म्हात्रेवर बदलापूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here