Home Breaking News बदलापूरात रेल्वे स्टेशनवर रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या ३०० आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

बदलापूरात रेल्वे स्टेशनवर रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या ३०० आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

63
0

पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथील आदर्श प्राथमिक शाळा मध्ये दोन चिमुकल्यांवर एका रोजंदारीवर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांने लैंगिक अत्याचार केल्यानंतर बदलापूर पूर्व पोलिस स्टेशन मध्ये पालकांना व दोन लहान मुलींना तब्बल १२ तास ताटकळत ठेवून देखील आरोपींवर गुन्हा दाखल न करता पोलिसांनी 👮 आरोपीला मदत केली.व सदरची शैक्षणिक संस्था ही एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता.यावरुन बदलापूर येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक होत त्यांनी बदलापूर येथील रेल्वे स्टेशनवर व रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केले होते.त्यामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती.आता या प्रकरणी रेल्वेच्या पोलिसांनी 👮 तब्बल एकूण ३०० आंदोलन कर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या व संतप्त आंदोलनकर्त्यांशी पोलिस आयुक्त तसेच रेल्वेचे पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी तसेच सरकार मधील मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन मागे घ्यावे.म्हणून चर्चा केली पण आंदोलनकर्त्यांची मागणी होती की आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी.किंवा आरोपीला आमच्या ताब्यात द्यावे.नंतर पोलिसांनी 👮 आंदोलन कर्ते यांच्यावर सायंकाळी सहा वाजता लाठीमार करून त्यांना रेल्वे ट्रॅकच्या बाहेर काढले.त्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती.दरम्यान यावेळी पोलिसांवर दगडफेक केल्या प्रकरणी एकूण २८ जणांना ताब्यात घेतले असून त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.तर‌ उर्वरित एकूण ३०० आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी 👮 आज गुन्हे दाखल केले आहेत.आता पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Previous articleपिंपरी -चिंचवड येथे घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, पाचजण भाजले ससून हॉस्पिटल मध्ये बर्न वार्ड मध्ये दाखल
Next articleकोलकात्याप्रमाणे बदलापूरची दखल सर्वोच्च न्यायालयाने का घेतली नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here