पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेध नोंदविण्यासाठी बदलापूर येथील रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर आंदोलन २० ऑगस्ट रोजी मंगळवारी करण्यात आले होते.यावेळी तब्बल ११ तास आंदोलन कर्ते यांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू केले होते.त्या मुळे या लोहमार्ग वरील रेल्वे लोकल व एक्स्प्रेसवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता.तसेच उग्र झालेल्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी पोलिसांवर देखील दगडफेक केली होती.यात पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले होते.त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या लाडकी बहीण व इतर आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करुन त्यांना रेल्वे ट्रॅकच्या बाहेर काढण्यात आलं होतं.त्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती.त्यानंतर रात्री पासूनच या भागातील राज्य सरकारच्या वतीने इंटरनेट सेवा बंद केली आहे.व कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून बदलापूर येथे पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.रेल्वे प्रवासी पेक्षा येथे पोलिसांची संख्या जास्त आहे.
दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.त्याला २६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कस्टडी सुनवली आहे.त्याला आज कल्याण येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.दोन चिमुकल्यावर अत्याचार व पालकांची पोलिस स्टेशन मध्ये न घेण्यात आली नव्हती.पालकांना व संबंधित लहान चिमुकल्यांना तब्बल १२ तास पोलिस स्टेशन मध्ये दिनांक १६ ऑगस्ट मध्ये बसवून त्यांना त्रास देऊन त्यांची फिर्याद पोलिसांनी घेतली नाही.व त्यांना पोलिसांनी पोलिस स्टेशन मधून हाकलून लावले.संबंधित शिक्षण संस्था ही भारतीय जनता पार्टीशी संबंधित लोकांची असल्याने पोलिसांवर राजकीय नेत्यांचा मोठ्या प्रमाणावर दबाव होता. म्हणून बदलापूरकर नागरिकांचा रोष हा सरकारवर मोठ्या प्रमाणावर होत.व आंदोलनकर्ते जास्त मोठ्या संख्येने उग्र होत त्यांनी सदर शाळेची तोडफोड केली व रेल्वे स्टेशन वरील रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू केले होते.त्यानंतरच महायुतीच्या सरकारचे धाबे दणाणले आणि त्या या प्रकरणांची एसआयटी मार्फत या घटनेची चौकशी सुरू केली आहे.आता वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाणार आहे.त्या बदलापूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाल्या आहेत.