Home Breaking News बदलापूर येथे वार्तांकन करणा-या महिला पत्रकाराला अपशब्द वापरणा-या वामन म्हात्रेवर बदलापूर पोलिस...

बदलापूर येथे वार्तांकन करणा-या महिला पत्रकाराला अपशब्द वापरणा-या वामन म्हात्रेवर बदलापूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

79
0

पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथे मंगळवारी दिनांक २० ऑगस्ट रोजी सदर घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अपशब्द वापरले की बदलापूर येथील घडलेल्या अत्याचारांच्या घटनेला  सर्वस्वी पत्रकारच कारणीभूत आहेत.पत्रकार आग लावण्याचे काम करत आहेत.तसेच ” तु आशा बातम्या देत आहेस की जणू काही अत्याचार आपल्यावरच झाला आहे..असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले.या बाबत महिला पत्रकार यांनी बदलापूर पोलिस स्टेशन मध्ये म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी 👮 तक्रार दाखल करुन घेतली नाही.आज शिवसेना उध्वव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे व अन्य महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी बदलापूर पोलिस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी आज सायंकाळी म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत तब्बल २४ तासानंतर शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सहा तास आंदोलन पोलिस स्टेशन बाहेर आंदोलन केल्यानंतर  हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणी आपण महिला पत्रकाराला असे बोललोच नाही असे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. परंतू वामन म्हात्रे हे बदलापूर येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या कार्यकरणीवर सदस्य आहेत असा दावा राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous articleबदलापूरातील घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची घोषणा
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here