पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मागील दोन दिवसांपासून पुण्यात विद्यार्थ्यांचे महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू असून आज अखेर विद्यार्थ्यांच्या या लढ्याला यश आले आहे.आज राज्य सरकारच्या वतीने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज गुरुवारी झालेल्या आयोगाच्या बैठकीत रविवारी दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पुढील तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल.अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने एक्स पोस्ट ट्वीट करण्यात आले आहे.
दरम्यान एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली तरी पुण्यात अद्यापही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.२५८ कृषी विभागाच्या जागांचा देखील एमपीएससी मध्ये सहभाग करावा, आणि तशी जाहिरात आली पाहिजे,गट क आणि गट ब ची जाहिरात ही १५ हजार जागांच्या वर आली पाहिजे अशी मागणी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.जोपर्यत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत,तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.अशी कठोर भूमिका आता विद्यार्थी यांनी घेतली आहे.हे आंदोलन पुण्यातील शास्त्री रोडवर होत आहे.यात आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थीं यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पोलिस आणि विद्यार्थी यांच्यात हामरातुमरी झाली आहे.यातील काही विद्यार्थ्यांना आंदोलन दरम्यान भोवळ आली होती.त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या आंदोलन स्थळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन विद्यार्थी यांच्याबरोबर चर्चा केली आहे.तसेच काल पासून आमदार रोहित पवार हे आंदोलनस्थळीच आहेत.