Home Breaking News कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक पंडीत यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी मागितली...

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक पंडीत यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी मागितली माफी

69
0

पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोल्हापूर येथे बुधवारी दिनांक २१ ऑगस्ट रोजी पत्रकारांना पोलिसांनी 👮 धक्काबुक्की केली होती.याबाबत आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे.दरम्यान ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते स्वप्नील कुसळेची भव्य स्वागत रॅली काढण्यात आली होती.यावेळी कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत आणि कनिष्ठ अधिकारी यांनी  पत्रकारसह कॅमेरामनशी तसेच प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना देखील धक्काबुक्की केली होती.दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे  आज कोल्हापूरात होते.यावेळी पत्रकारांनी काल घडलेला प्रकार फडणवीस यांना सांगितल्यावर त्यांनी याबाबत पत्रकारांची माफी मागितली आहे.

Previous articleचंद्रपूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांमध्ये दे दणादण राडा
Next articleमुख्यमंत्र्यांशी चर्चा नंतर महाराष्ट्रातील डॉक्टरांचा संप मागे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here