Home Breaking News चंद्रपूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांमध्ये दे दणादण राडा

चंद्रपूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांमध्ये दे दणादण राडा

69
0

पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.त्यांची आजची चंद्रपूर येथील बैठक संपताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सचिन भोयर व चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांन मध्ये राडा झाला.यात मोठ्या प्रमाणावर हाणामारी करण्यात आली.सचिन भोयर यांच्या विधान सभेच्या उमेदवारीला विरोध होत असल्याच्या कारणा वरुन हा राडा होऊन हाणामारी झाल्याचे सूत्रांद्वारे समजत आहे.त्यामुळे आता या हाणामारी नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील अंतर्गत धूसफूस  असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.या हाणामारी नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणता निर्णय घेणार ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Previous articleडॉ डीन संदीप घोष यांची होणार पाॅलीग्राफी टेस्ट
Next articleकोल्हापूरचे पोलिस अधीक्षक पंडीत यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी मागितली माफी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here