Home Breaking News डॉ डीन संदीप घोष यांची होणार पाॅलीग्राफी टेस्ट

डॉ डीन संदीप घोष यांची होणार पाॅलीग्राफी टेस्ट

120
0

पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण भारतात गाजलेल्या कोलकाता मधील आरजी कर मेडीकल कॉलेज मध्ये ट्रेनी महीला डॉक्टरवर बलात्कार तिची हत्या करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण भारतभर पसरले होते.यानंतर या घटनेचा तपास हा कोलकाता पोलिसां कडून काढून सदरचा तपास हा सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.दरम्यान या मेडीकल कॉलेज चे डाॅ व डीन संदीप घोष यांची पाॅलीग्राफी टेस्ट करण्या साठी सीबीआयला कोर्टाची परवानगी मिळाली आहे. यामुळे आता डीन घोष यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.त्याच बरोबर चार ट्रेनी डॉक्टराचीही  पाॅलीग्राफी टेस्ट करण्यात येणार आहे.तसेच या व्यतिरिक्त ट्रेनी महीला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करणारा मुख्य आरोपी संजय राॅयच्या पाॅलीग्राफी टेस्ट मंजूरीवर कोर्ट उद्या शुक्रवारी निर्णय देणार आहे.

Previous articleकाॅग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत दाखल
Next articleचंद्रपूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांमध्ये दे दणादण राडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here