Home Breaking News नाशिक मध्ये आदीत्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

नाशिक मध्ये आदीत्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

61
0

पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आहे.दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाड्याचा ताफा जात असताना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीला दुचाकीस्वारने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे,

दरम्यान विधानसभांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत.आज त्यांचा नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.आज ते येवला व नांदगाव मतदार संघाचा आढावा घेणार आहेत.दरम्यान त्यांचा ताफा हा मानमाडच्या दिशेने जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे.यात गाडीची काच फुटली आहे.तर दुचाकीस्वाराला किरकोळ मार लागला आहे.

Previous articleबदलापूर नंतर कोल्हापूर हादरले, दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन खून‌ ऊसाच्या शेतात आढळला मृतदेह
Next articleकाॅग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here