Home Breaking News बदलापूर नंतर कोल्हापूर हादरले, दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन खून‌ ऊसाच्या शेतात...

बदलापूर नंतर कोल्हापूर हादरले, दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन खून‌ ऊसाच्या शेतात आढळला मृतदेह

102
0

पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार बदलापूर नंतर आता कोल्हापूर हादरले आहे.कोल्हापूर येथील शिये गावातील राम नगर परीसरातून आता एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.दरम्यान कोल्हापूरात दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे.त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.अत्याचार पीडीत मुलगी ही बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी 👮 दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पीडीत मुलगी ही मूळची बिहारची असून ती तिच्या आई व वडील व पाच भावंडासमावेत रामनगर भागात राहत होती मुलीचे आई वडील हे शिरोली एमआयडीसी मधील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करतात.मुलगी बेपत्ता असल्याने पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती.यानंतर आज पोलिसांनी डॉग स्काॅडच्या सहाय्याने शोध घेतला असता शिये पासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात या पीडीत मुलीचा मृतदेह सापडला आहे.मुलीचा मृतदेह आता वैद्यकीय तपासणी साठी पाठविण्यात आला असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर याबाबतचा अधिकचा खुलासा करता येईल असे पोलिसांनी माध्यामाशी बोलताना सांगितले आहे.

Previous articleअदाणीच्या घोटाळ्याच्या विरोधात ईडीच्या कार्यालयासमोर काॅग्रेस पक्षाचे आंदोलन
Next articleनाशिक मध्ये आदीत्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here