Home Breaking News मुख्यमंत्र्यांशी चर्चा नंतर महाराष्ट्रातील डॉक्टरांचा संप मागे

मुख्यमंत्र्यांशी चर्चा नंतर महाराष्ट्रातील डॉक्टरांचा संप मागे

62
0

पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोलकाता येथील मेडिकल कॉलेज मध्ये ट्रेनी महीला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर सुरक्षेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील सर्व मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी महाराष्ट्रात संप सुरू केला होता.दरम्यान आज मार्डच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत केलेल्या सकारात्मक चर्चा वेळी डॉक्टर यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्र्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.दरम्यान विविध मागण्यासाठी डॉक्टरांनी हा संप पुकरला होता.निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवास व्यवस्था मिळावी.तसेच वसतिगृह उपलब्ध करून द्यावे.तसेच म्हत्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळावे.अशा मागण्या या डॉक्टरांच्या होत्या.

Previous articleकोल्हापूरचे पोलिस अधीक्षक पंडीत यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी मागितली माफी
Next articleसुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर कोलकात्यातील डॉक्टरांचे आंदोलन मागे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here