पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार कोलकात्यातील डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.मागील काही दिवसां पासून वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला तसेच अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांनी हे आंदोलन मागे घेण्या संदर्भात आवाहन करण्यात आले होते.ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व खून प्रकरणांचा निषेध म्हणून डॉक्टरांनी संप पुकारण्यात आला होता.मागील ११ दिवसांपासून आंदोलन पुकारण्यात आले होते. दरम्यान आज एम्स व आरएमएलच्या डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले आहे.पण काही उर्वरित काही संघटनांनी मात्र आंदोलन कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान ज्या डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले आहे. अशा डॉक्टरांवर प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची कारवाई करु नये असे निर्देश देखील आज सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत.