पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंजाब राज्यातील बठिंडा येथील खासदार हरसिमरत कौर यांनी खासदार कंगना रणौतच्या ‘ एमरजन्सी ‘ चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.सदरचा सिनेमा हा प्रदर्शित करण्यापूर्वी शिरोमणी गुरुद्वार समितीला दाखवा व नंतरच प्रदर्शित करावा अशी मागणी केली आहे.दरम्यान त्यांनी पुढे बोलताना म्हणाले आहे की अकाली दलाने आणीबाणी मध्ये मोठा संघर्ष केला आहे.मात्र या चित्रपटात शिखांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे.असा गंभीर आरोप खासदार कौर यांनी केला आहे.तसेच या चित्रपटावर बंदी घालण्याची देखील मागणी काही शिख संघटनांनी केली आहे.त्यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘एमरजन्सी ‘ चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.