पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोल्हापूर येथे बुधवारी दिनांक २१ ऑगस्ट रोजी पत्रकारांना पोलिसांनी 👮 धक्काबुक्की केली होती.याबाबत आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे.दरम्यान ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते स्वप्नील कुसळेची भव्य स्वागत रॅली काढण्यात आली होती.यावेळी कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत आणि कनिष्ठ अधिकारी यांनी पत्रकारसह कॅमेरामनशी तसेच प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना देखील धक्काबुक्की केली होती.दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कोल्हापूरात होते.यावेळी पत्रकारांनी काल घडलेला प्रकार फडणवीस यांना सांगितल्यावर त्यांनी याबाबत पत्रकारांची माफी मागितली आहे.