पुणे दिनांक २२ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्राला हदरविणा-या बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार शाळेतील सफाई कामगारांने केला होता. आता या प्रकरणी मुंबईतील हायकोर्टात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे.यावर आज गुरुवारी सकाळच्या सत्रात तातडीची सुनावणी होणार आहे.न्यायाधिश भारती डोंगरे आणि न्यायाधिश मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होईल आता संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी.अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान दिनांक १२ ऑगस्ट रोजी बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकल्यांनावर अत्याचाराची घटना घडली होती.