Home Breaking News उध्दव ठाकरे उद्या शिवसेना भवनासमोरील चौकात ११ वाजता तोंडाला काळी फिती लावून...

उध्दव ठाकरे उद्या शिवसेना भवनासमोरील चौकात ११ वाजता तोंडाला काळी फिती लावून बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करणार

66
0

पुणे दिनांक २३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उच्च न्यायालयाने उद्या शनिवारी होणारा बंद बेकायदेशीर ठरविला आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते यांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शिवसेना उध्वव ठाकरे यांनी देखील बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.पण ते स्वतः रस्त्यावर उतरणार आहे.त्यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की महाविकास आघाडीचे सर्व नेते काळ्या फिती लावून लावून निषेध करणार आहे.मी स्वतः सकाळी ११ वाजता शिवसेना भवन समोरील चौकात तोंडाला काळ्या फिती लावून बसणार आहे. त्याला कोणी मनाई करु शकत नाही.आणि त्याला बंदी केली तर जनतेच्या न्यायालय आहे.दरम्यान आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान पत्रकार परिषदेत शिवसेना उध्वव ठाकरे म्हणाले की.कायदा ज्यांच्या हातात आहे.ते बेजबाबदारपणे वागत असतील त्याचा उल्लेख कोर्टाने केला आहे.कोर्टानेच काल सरकारला विचारले होते की भावना व्यक्त करण्याचा अधिकार लोकांना आहे की नाही बंद म्हणजे आम्ही काय दगडफेक करा.हिंसाचार करा.असे म्हटले नव्हते सर्वांना आपल्या कुटुंबाची काळजी आहे.बहिण व आईची काळजी आहे.तिचे रक्षण करणार कोण आहे.हे सर्वांच्या मनात आहे.या मुळे बंद करायचा प्रयत्न केला.बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर तोंडचं बंद करणार आहोत.मी स्वतः शिवसेना भवना समोरील चौकात जाऊन बसणार आहे.व तोंडाला काळी फीत लावणार आहे. मला वाटतं तिथे मला कोणी रोखू शकतणार नाही. माझे रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही.असे लोकांना वाटते.तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. दरम्यान बांगलादेशात ते सर्वांनी पाहिले आहे.ते आपल्या देशात होऊ नये.म्हणून आमचे प्रयत्न आहेत.आमचे आंदोलन थांबणार नाही.आम्ही लोकशाही मार्गाने आमचे  आंदोलन करत राहणार आहे.दरम्यान हे सरकार नराधमांना पाठिशी घालवत आहे.उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे.ते स्वतःच्या विश्र्वात मश्मुल आहेत.त्यामुळेच आम्ही आंदोलन करणार आहोत.असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.दरम्यान आता बदलापूरच्या केसवर आता कोर्ट फास्ट ट्रॅक काय असते ते दाखवेल अशी आशा आहे.काल कोर्टाने जे थोबडवले ते मुख्यमंत्री आणि सरकारला चपराक नाही का ? आताही मी कौतुक करत आहे.न्यायालयाच्या भूमिकेचे कौतुक आहे. न्यायालय हे तत्परतेने हलू शकते.तीच तत्परता त्यांनी ज्या कारणासाठी आंदोलन करणार होतो त्यावर  दाखवली पाहिजे.आरोपींना शिक्षा सुनावली पाहिजे. असे शिवसेना उध्वव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Previous articleउद्याचा महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घ्या, जेष्ठ नेते शरद पवार यांचं आव्हान
Next articleसातारा जिल्ह्यातील भाजपचे आमदार गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडविलं एकाचा घटनास्थळीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here