पुणे दिनांक २३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नेपाळमध्ये ४० प्रवाशांची बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.हे सर्व भाविक जळगाव जिल्ह्यातील आहेत दरम्यान अपघातानंतर महाराष्ट्र सरकारच्या वतीने नेपाळच्या दुतवासाशी तातडीने संपर्क साधला असून जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत.अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान नेपाळमध्ये आज शुक्रवारी एक भारतीय बस नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे.यामध्ये एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर हा अपघात भीषण असून यात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.यातील काही भाविक हे जळगाव येथील आहेत . या बस मधून ४० पेक्षा जास्त प्रवासी हे या बसमधून प्रवास करीत होते.यातील अनेकजण बेपत्ता असून त्यांचा शोध प्रशासनाच्या वतीने घेतला जात आहे. दरम्यान या अपघाताबाबत पीडीतीच्या नातेवाईकां साठी हेल्पलाईन क्रमांक+977-9851107021 हा जाहीर करण्यात आला आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.