पुणे दिनांक २३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक बातमीची मोठी अपडेट हाती आली असून.संपूर्ण महाराष्ट्रात बदलापूर येथील एका खासगी शाळेतील दोन चिमुकल्यांवर लैंगिक झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यात शिक्षणाच्या पंढरीत एक खळबळजनक घटना घडली आहे.पुण्यात स्कूल बस चालकाने एका मुलीला चक्क व्हॅन चालकाने मेसेज करुन तु मला खुप आवडते असा मेसेज केला होता.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गणेश भोकरे यांनी स्कूल व्हॅन चालकाची चांगलीच मनसे स्टाईलने धुलाई केली आहे.संबंधित व्हॅन चालकांवर पुणे पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल करुन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्यामुळे आता पुणे या शिक्षणाच्या माहेर घरात देखील मुली सुरक्षीत नसल्याचे एकंदरीत चित्र पुढे आले आहे.