पुणे दिनांक २३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार उद्या शनिवारी दिनांक २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली होती.दरम्यान महाराष्ट्र बंद करण्याची कोणतीही पक्षाला परवानगी नाही.असे मुंबई उच्च न्यायालयाने आज दुपारी स्पष्ट केले आहे.जर बंद पुकारला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा.असे देखील न्यायालयाच्या वतीने निर्देश दिले आहेत.दरम्यान महाविकास आघाडीने बदलापूर प्रकरणावरून उद्या शनिवारी दिनांक २४ ऑगस्ट रोजी बंदची हाक दिली होती.त्या बंदच्या विरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी व अन्य काही लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.दरम्यान आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधक हे उद्या महाराष्ट्र बंद बाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.