Home Breaking News सिंहगड रोडवर रक्तरंजित थरार भररोडवर सराईत गुन्हेगारांच्या डोक्यात हातोडा 🔨 घालून हत्या;...

सिंहगड रोडवर रक्तरंजित थरार भररोडवर सराईत गुन्हेगारांच्या डोक्यात हातोडा 🔨 घालून हत्या; तिघांच्या आवळल्या मुसक्या

121
0

पुणे दिनांक २३ ऑगस्ट (पोलख़ोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील सिंहगड रोडवर दिनांक २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यात एका सराईत गुन्हेगारांच्या डोके हातोडीने ठेचून हत्या करण्यात आली आहे.दरम्यान सदरची घटना ही सिंहगड रोड भागातील वडगाव पुलाजवळील क्लासिक बार समोर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे.सदरच्या घटनेत गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय३४ रा.धायरी फाटा सिंहगड रोड पुणे) असे नाव आहे.सदर खूना प्रकरणी सिंहगड पोलिसांनी तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान या घटने बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सिंहगड रोड वरील एका परमिट रूम मध्ये एक रेकॉर्डवरील गुन्हेगार गोट्या शेजवाळ त्याच्या मित्रांनी बरोबर दारु पिण्यासाठी बसला होता.दरम्यान गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दारुच्या बिलावरुन परमिट रूमचा मालक व गोट्या शेजवाळ यांच्यात वाद झाला वादानंतर गोट्या परमिट रूम मधील दारु पिल्याचे बील न देताच बाहेर आला तो जात असताना त्याला बाउन्सरने हाॅटेल बाहेर अडविले त्यावेळी गोट्या  बाहेर देखील बाउन्सर बरोबर वाद घालत होता.यात वाद टोकाला गेला यावेळी बाउन्सरने शेजारी असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानातून होतोडी आणून गोट्याच्या डोक्यात घातली  हातोड्याचा घाव वर्मी बसताच गोट्या जमिनीवर कोसळला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.व पंचनामा करून गोट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.या हत्या बाबत पोलिसांनी 👮 तीन जणांच्यावर‌ खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.दरम्यान सिंहगड रोडवर दिवसां दिवस गुन्हेगारीच्या संख्यात झपाट्याने वाढ होत आहे.

Previous articleकागलमध्ये समरजित घाडगेंनी हटवलं कमळ चिन्ह, हातात तुतारी घेण्याची शक्यता
Next articleपुण्यातील मोदी बागेतील पवारांच्या निवासस्थानी एमपीएससीचे विद्यार्थी दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here