पुणे दिनांक २३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील शास्त्रीनगर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन पुणे पोलिसांनी 👮 काल मोडून काढले आहे.यात आंदोलनकर्ते यांच्या काही मागण्या राज्य सरकारच्या वतीने मान्य केल्या व संबंधित परीक्षा पुढे ढकलली गेली होती.पण प्रशिक्षणाचे वेळापत्रक मात्र जाहीर करण्यात आले नाही.त्यातच अजून काही मागण्या शिल्लक असल्याने आता हे आंदोलनकर्ते विध्यार्थी हे आज सकाळीच जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बागेतील निवासस्थानी गेले असून त्यांच्या समावेश शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे बरोबर आहेत.आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर विद्यार्थी हे एमपीएससी राज्यसेवा परीक्षा बाबत चर्चा करत आहेत.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.