विकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद, राज्यात लहान मुलींनवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ.पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांची रात्री वर्षावर बैठक
पुणे दिनांक २३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात महिलांवर व लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.तसेच बदलापूर येथील आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज या सर्व पार्श्वभूमीवर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.व सरकारला धारेवर विरोधकांनी धरले आहे.तसेच विकास आघाडीच्या वतीने उद्या दिनांक २४ ऑगस्ट शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.तसेच काॅग्रेस पक्षाच्या वतीने मंत्रालयवर मोर्चा व मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर उद्योगपती अदानी यांच्या घोटाळ्यावर ईडीच्या वतीने चौकशी करावी मागणी साठी खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काल मोर्चा काढण्यात आला होता.एकंदरीत विरोधकांनी महायुतीच्या सरकारवर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे महायुतीच्या सरकार चांगलेच हातबल झाले आहे.यासर्वावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली आहे.मात्र या बैठकीत घेण्यात काय चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही .ते मात्र गुलदस्त्यात आहे.