Home Breaking News आजच्या महाराष्ट्रातील बंद बाबत खासदार संजय राऊत यांनी सकाळी सकाळी साधला माध्यामाशी...

आजच्या महाराष्ट्रातील बंद बाबत खासदार संजय राऊत यांनी सकाळी सकाळी साधला माध्यामाशी संवाद

45
0

पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शनिवारी सकाळी संपूर्ण महाराष्ट्रात बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला जात आहे.दरम्यान आज याबाबत उध्दव ठाकरे गटाचे शिवसेनाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की.आक्रोश देशभर पोहचवण्यासाठी आजचा बंद होता.दरम्यान याआधी झालेल्या भारतबंद विरोधात कोणी कोर्टात याचिका दाखल केली नाही.दरम्यान महाविकास आघाडीच्या बंद विरोधात महायुती सरकारने याचिकाकर्त्याला कोर्टात पाठवले.कोर्टाचा सन्मान राखावा लागतो.ही परंपरा आहे.दरम्यान कोर्टाने जनभावनेचा आदर करायला पाहिजे होता.कोर्टाला देखील लेकी बाळी .सुना आहेत.न्यायदेवता ही स्त्री आहे.भविष्यात अशा घटना घडल्यास कोर्ट आणि याचिकाकर्त्यांची जबाबदारी. महाराष्ट्रात कोणीही सुरक्षित नाही.

Previous articleबदलापूर अत्याचार घटनेचा निषेध मोर्चात जेष्ठ नेते शरद पवार सहभागी, तोंडाला बांधला काळा मास्क
Next articleबदलापूरात शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल पोलिसांसमोरच संस्थाचालक झाला फरार , सरकार कडून मात्र इतर शासकीय अधिकारी यांचे निलंबन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here