Home Breaking News देशात महाराष्ट्राचा लौकिकाला धक्का – जेष्ठ नेते शरद पवार

देशात महाराष्ट्राचा लौकिकाला धक्का – जेष्ठ नेते शरद पवार

58
0

पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज सकाळी साडे दहा वाजता बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांची घटना घडली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ मुकमोर्च तोंडाला काळी फिती लावून महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भरपावसात आंदोलन केले यावेळी पवार म्हणाले की.राज्यातील मुली – महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी महायुतीच्या सरकारवर आहे.याची जाणीव या राज्यकर्त्यांना नाही.अशी टीका केली आहे.दरम्यान  बदलापूर येथील बालिकेवर अत्याचारांच्या घटनेनंतर देशभरात महाराष्ट्राच्या लौकिकाला धक्का बसला आहे. महाराष्ट्रात दररोज अशा घटना घडत आहेत. त्याची सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. संवेदनशीलपणे या गोष्टी हाताळल्या पाहिजेत . असेही यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.

Previous articleमहाविकास आघाडीच्या वतीने दौंड शहरात संविधान संत्भा समोर बदालापूर घटनेचा निषेध
Next articleपुणे जिल्ह्यात पौड जवळ हेलिकाॅप्टर कोसळलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here