पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांच्या घटनेनंतर आज शनिवारी सकाळी साडे दहा वाजता पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडी च्या वतीने निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने मुकमोर्च आंदोलन तोंडाला काळ्या फिती लावून भर पावसात करण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेव्हा नेते शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्रात वर्दीची भिती राहिली नाही.अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. आंदोलक हे भारतीय लेकीसाठी लढत होते.सरकार असंवेदनशील प्रत्येक गोष्टीत राजकरण करतंय. आरोपीला फाशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. असा इशाराच खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला दिला.