Home Breaking News बदलापूरात शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल पोलिसांसमोरच संस्थाचालक झाला फरार , सरकार कडून...

बदलापूरात शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल पोलिसांसमोरच संस्थाचालक झाला फरार , सरकार कडून मात्र इतर शासकीय अधिकारी यांचे निलंबन

49
0

पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनाम ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथे आदर्श खासगी शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांच्या घटनेनंतर आता शाळा व्यवस्थापनवर पोस्को कायद्या नुसार गुन्हा दाखल झाला असून आता ही संस्था भाजप व संघ परिवाराशी संबंधीत आहे.त्यामुळे हे प्रकरण महायुती सरकारने युद्ध पातळीवर दाबण्याचा प्रयत्न केला गेला पण या प्रकरणी संपूर्ण बदलापूरकर हे रस्त्यावर उतरल्या नंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.दरम्यान संस्थाचालक नाॅट रिचेबल झाले आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाला तेव्हा संस्थाचालक  राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी सिंग यांच्या भेटी करीता आले होते. त्याला आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांने पोलिसांच्या समोरच बमला पाय लावून पळून गेला आहे.एकप्रकारे त्याला पळण्या साठी पोलिसांनीच त्याला पळून जाण्यास मदत केली आहे.तो नाॅट रिचेबल झाले.त्यामुळे एवढं सर्व घडून देखील पोलिसांच्या मधये काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे पोलिस आणि गृहखाते अजून संस्था चालकांची एकप्रकारे पाठराखण करीत असल्याचा आरोप आहे.

दरम्यान याच प्रकरणी दुसरीकडे मात्र बदलापूर अत्याचार प्रकरणात ठाण्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी बाळासाहेब रक्षे यांना निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान या अत्याचार प्रकरणी संबंधित यंत्रणेला माहिती न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.तर मुंबईत महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकल यांना शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे न लावण्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.निष्काळजीपणा करणाऱ्यांना या कारवाईतून कठोर संदेश दिला आहे तर दुसरीकडे मात्र सदरची आदर्श प्राथमिक शाळा ही भाजपच्या व संघाच्या  लोकांशी संबंधित असल्या कारणाने मात्र संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मात्र दुसरीकडे हे महायुतीचे सरकार पाठीशी घालत आहे.

Previous articleआजच्या महाराष्ट्रातील बंद बाबत खासदार संजय राऊत यांनी सकाळी सकाळी साधला माध्यामाशी संवाद
Next articleपुण्यात भरपावसात खासदार सुप्रिया सुळेंची महायुती सरकारवर घणाघाती टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here