पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज संपूर्ण महाराष्ट्रात बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर शाळेत लैंगिक अत्याचारांची घटना घडली होती.त्या घटनेचा निषेध आज शनिवारी दिनांक २४ रोजी सर्वत्र होत आहे.या घटनेचा निषेध दौंड शहरात संविधान संत्भ चौकात पुतळ्या समोर महाविकास आघाडीच्या वतीने मुकमोर्च आंदोलन तोंडाला काळ्या फिती लावून करण्यात आला आहे.यावेळी महायुती सरकारचा निषेध करण्यात आला आहे.तसेच यातील आरोपीला फाशीची शिक्षा तातडीने देण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
दरम्यान यावेळी महाविकास आघाडीचे सर्वांचं नेते मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेष्ठ नेते शरद पवार गटाचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार.तालुका युवक अध्यक्ष सचिन काळभोर.शहरअध्यक्ष सचिन गायकवाड.विद्यार्थी संघटना अध्यक्ष पंकजभाऊ नांदखिले.सोशलमिडीया तालुका अध्यक्ष चैतन्य पाटोळे.महिला अध्यक्ष मनीषा ताई सोनवणे.काॅग्रेस अध्यक्ष हरीश भाई ओझा.प्रकाश सोनवणे.शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद सुर्यवंशी.शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिलतात्या सोनवणे.शहरप्रमुख आनंद पळसे . तसेच शरद पवार गटाचे दौंड शहर युवक उपाध्यक्ष दीपक सोनवणे. व जिल्हाप्रमुख पूर्वाताई शहा .व संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.