पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नेपाळ मध्ये महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला अपघात शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता झाला होता.दरम्यान या अपघातात मध्ये एकूण २७ भाविकांचा मृत्यू झाला आहे.यातील २४ जण हे भुसावळ जिल्ह्यातील आहेत.तर यात काही भाविक गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांच्यावर नेपाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान बस अपघातातील पीडीतांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन लाख रुपये दिले जाणार आहेत.तर जखमींना ५० हजार रुपये मदत केली जाणार आहे.असे पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने ट्टीट करुन याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान नेपाळमध्ये बस अपघातात मृत्यू झालेल्या २५ भाविकांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचे विशेष विमानाने नेपाळ वरुन उड्डाण केले आहे.हे विमान जळगावच्या विमानतळावर थोड्यच वेळात लॅंड करेल दरम्यान सदरचे मृतदेह विमानतळावक्ष घेण्यासाठी भुसावळ येथून रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.दरम्यान यातील मृत भाविक हे जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तळलेल भागातील आहेत.