पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर अचानकपणे कोसळले आहे.यात एकूण चारजण होते.यातील दोन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.सदरच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळले असावं असा सुरुवातीला प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.तसेच पुण्यात खराब वातावरणामुळे देखील ही घटना घडली असू शकते आता असा देखील एक अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्याण पौड मध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान यातील लोकांना फक्त किरकोळ दुखापत झाली आहे.