Home Breaking News पुण्याला रेड अलर्ट जारी! खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात सुरुवात...

पुण्याला रेड अलर्ट जारी! खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात सुरुवात नागरिकांना सतर्कतेचा इशारा

99
0

पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज पुण्यात मुसाळधार पावसाला सुरुवात झाली आहे.दरम्यान हवामान विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट इशारा दिला आहे.  घाट माथ्यावर व धरणक्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणे क्षेत्रा मधून मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात असल्या मुळे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामळे नदी काठावरील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे प्रशासनाच्य वतीने आवाहन केले आहे.

दरम्यान आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणक्षेत्रात पाणी पातळीत वाढ झाली असल्याने मुठा नदीच्या पात्रात १९ हजार ११८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नदीच्या पात्रात उतरु नये खबरदारी घ्यावी तसेच धरणक्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत राहिल्यास नदी पात्रात पून्हा विसर्ग कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.तसेच नदीकाठच्या नागरिकांनी याची दक्षता घ्यावी.तसेच सखल भागात जाऊ नये. असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleपुणे जिल्ह्यात पौड जवळ हेलिकाॅप्टर कोसळलं
Next articleनेपाळ बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत, थोड्याच वेळात मृतदेह जळगाव विमानतळावर येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here