पुणे दिनांक २५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात काल दिवसभर पाऊस कोसळत आहे.तर आज रविवारी पुण्याला रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.आज पुणे शहर व जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.असा हवामान खात्याच्या वतीने अंदाज वर्तविण्यात आला आहे.दरम्यान धरणक्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणा वर मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात असल्याने काल रात्री भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे तर पुलाची वाडी येथील घरात पाणी शिरले आहे.दरम्यान आज पुणे. सातारा.रायगड .या भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान आज पुण्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.तसेच काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस सुरू आहे.तसेच पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस सुरू आहे.सखल भागात पाणी साचले आहे.रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणावर पडले आहे.तर डेक्कनच्या नदी पात्रात काही गाड्या पाण्यात गेल्या आहेत यात दुचाकी देखील पाण्यात गेल्या आहेत.तर अनेक लोक पाणी पाहण्यासाठी पुलावर गर्दी करत आहे.तसेच खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेकने पाणी मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.दरम्यान नदी च्या काठी राहणाऱ्या लोकांना प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.आज गरज असेलतरच घरा बाहेर पडा असे देखील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.